वेळोशी येथे श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन व यात्रा महोत्सवाचे आयोजन

फलटण (आपलं फलटण) वेळोशी ता.फलटण येथील श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन व यात्रा महोत्सव दि.10 व11 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, पंचक्रोशीतील भाविकांसाठी हा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी सरपंच सुरेश रोमन यांनी दिली.
महोत्सवाची सुरुवात सायंकाळी ७ वाजता श्री पालखी पूजन सोहळ्याने होणार असून, या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर प्रमुख उपस्थिती दर्शविणार आहेत. तसेच महंत श्री राहेरकर बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे.
या प्रसंगी मा. श्री. आबाजी काळे, मा. सौ. विजयमाला गाजरे (पोलीस उपनिरीक्षक, फलटण शहर), मा. श्री. रत्नाकर जाधव तसेच मा. विलासराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी सन्मित्र भजनी मंडळ, कराड यांच्याकडून भजन सेवा सादर केली जाणार आहे. शनिवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी श्री मूर्ती मंगलस्नान, श्रीमद् भागवत गीता पारायण व ध्वजारोहण होईल. दुपारी महाआरती, पंचपक्वान्नांचा महाप्रसाद तर सायंकाळी पालखी सोहळा व शोभायात्रा (घोडायात्रा) काढण्यात येणार आहे.
या धार्मिक सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीकृष्ण मंदिर देवस्थान, वेळोशी तसेच ज्ञानसाधना महानुभाव आश्रम व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई शाळेची दहावीमध्ये ९९.१०% निकालाची दमदार झेप फलटण (आपलं फलटण )फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित जाधववाडी येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल (CBSE) चा इयत्ता दहावीचा निकाल यंदा ९९.१०…

    Spread the love

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    फलटण( आपलं फलटण)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात साजरा करण्यात आलेला जयंती महोत्सव यंदा भव्यतेचा नवा उच्चांक गाठत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. शहरभर दिमाखदार रोषणाई, आकर्षक…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात

    सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात

    फलटण पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; विविध विभागांचा आढावा, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

    फलटण पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; विविध विभागांचा आढावा, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    प्रधानमंत्री आवास योजना २.० चा लाभ घ्या; नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर

    प्रधानमंत्री आवास योजना २.० चा लाभ घ्या; नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर

    विडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विविध उपक्रमांनी परिसर दणाणला

    विडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विविध उपक्रमांनी परिसर दणाणला
    error: Content is protected !!