कृतित्वाचा झळाळता गौरव; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! डॉ. सौ. वैशाली शिंदे यांना नवी दिल्लीत प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ प्रदान

फलटण( आपलं फलटण) येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या संस्थापिका असलेल्या व
फलटणच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणाऱ्या डॉ. सौ. वैशाली शिंदे यांना नवी दिल्लीत प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ नुकताच प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे भव्य समारंभात हा मानाचा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या डॉ. शिंदे यांनी आपल्या कार्यातून वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला असून, यामुळे फलटणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या सोहळ्यास दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. शिंदे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, फलटण तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. वैशाली शिंदे म्हणाल्या, “हा सन्मान माझ्या एकटीचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आहे. समाजसेवा व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
या यशानंतर आयडियल इंटरनॅशनल शैक्षणिक संकुलासह फलटण शहर परिसरातील कार्यक्षेत्रात आनंदोत्सवाचे वातावरण असून, संस्थेचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. डॉ. शिंदे यांच्या या यशामुळे फलटणच्या शैक्षणिक क्षेत्राचा लौकिक अधिक उंचावला आहे.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!