दोन ऐतिहासिक घराण्यांची स्नेहभेट; साताऱ्यात परंपरेचा पुन्हा उजाळा

सातारा (प्रतिनिधी) : सातारा आणि फलटण या दोन ऐतिहासिक राजघराण्यांमधील ऋणानुबंधांची परंपरा पुन्हा एकदा उजळून निघाली. फलटण संस्थानचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.
या स्नेहभेटीत दोन्ही मान्यवरांमध्ये अत्यंत आपुलकीचे व स्नेहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नातेसंबंधांचा धागा अधिक दृढ होत असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले.
भेटीदरम्यान दोन्ही घराण्यांच्या वैभवशाली इतिहासाचा आढावा घेत, हा ऐतिहासिक वारसा जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच भूतकाळातील आठवणी, प्रसंग आणि ऐतिहासिक संदर्भांना उजाळा देत काही भावनिक क्षणही अनुभवले गेले.
राजकीय व सामाजिक व्यस्ततेतून वेळ काढत दोन्ही मान्यवरांनी खेळीमेळीच्या वातावरणात मैत्रीचे क्षणही सामायिक केले. या स्नेहभेटीतून परस्पर आदर, जिव्हाळा आणि ऐतिहासिक परंपरेची झलक पाहायला मिळाली.
दरम्यान, या भेटीमुळे सातारा व फलटण या दोन्ही घराण्यांमधील नातेसंबंध नव्या उर्जेने अधिक दृढ झाल्याची भावना समर्थकांमध्ये व्यक्त होत असून, परिसरात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love
  • Related Posts

    श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई शाळेची दहावीमध्ये ९९.१०% निकालाची दमदार झेप फलटण (आपलं फलटण )फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित जाधववाडी येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल (CBSE) चा इयत्ता दहावीचा निकाल यंदा ९९.१०…

    Spread the love

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    फलटण( आपलं फलटण)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात साजरा करण्यात आलेला जयंती महोत्सव यंदा भव्यतेचा नवा उच्चांक गाठत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. शहरभर दिमाखदार रोषणाई, आकर्षक…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात

    सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात

    फलटण पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; विविध विभागांचा आढावा, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

    फलटण पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; विविध विभागांचा आढावा, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    प्रधानमंत्री आवास योजना २.० चा लाभ घ्या; नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर

    प्रधानमंत्री आवास योजना २.० चा लाभ घ्या; नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर

    विडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विविध उपक्रमांनी परिसर दणाणला

    विडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विविध उपक्रमांनी परिसर दणाणला
    error: Content is protected !!