फलटण तालुक्यात उन्हाचा कडाका; रसवंतीची घुंगरे खुळखुळू लागली!फलटणमध्ये रसवंतीची लगबग!

​ फलटण (आपलं फलटण)
मार्च महिन्यात फलटण तालुक्यात उन्हाचा चटका प्रचंड प्रमाणात जाणवू लागला असून, उन्हाळ्याची अधिकृत वर्दी देणारी ‘रसवंती गृहांची घुंगरे’ आता ठिकठिकाणी खुळखुळू लागली आहेत. सकाळपासूनच सूर्यदेव आग ओकू लागल्याने घसा ओला करण्यासाठी नागरिकांचे पाऊले रसवंती गृहाकडे वळू लागली आहेत.
    फलटण-पुणे, फलटण-सातारा, पंढरपूर  बारामती दहिवडी महामार्गांवर, छोट्या-मोठ्या मार्गावरील रस्त्याकडेला तसेच शहरातील चौका चौकात, गल्लीबोळात वर्दळीच्या ठिकाणी रसवंती गृहे थाटण्यात येत आहेत. काही ठिकाणी आजही बैलांच्या सहाय्याने चालवले जाणारे पारंपारिक घाणे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा तो लयबद्ध आवाजाचा नाद ऐकत थंडगार रसाचा आस्वाद घेणे, हा एक वेगळाच अनुभव प्रवाशांना मिळत आहे. बैलाच्या गळ्यातील घुंगराचा आवाज लुप्त होत असतानाच रसवंती ग्रहावर इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने घुंगराचा आवाज खुळखुळवला जात आहे.
      वाढत्या उन्हामुळे शीतपेयांच्या (Cold Drinks) बाटल्यांपेक्षा निसर्गदत्त अशा उसाच्या रसाला नागरिकांनी अधिक पसंती दिली जात आहे. आल्याचा तिखटपणा, लिंबाचा आंबटपणा आणि पुदिन्याचा सुगंध असलेला हा रस शरीराला थंडावा देण्यासोबतच ऊर्जाही देतो. ‘ पंधरा-वीस रुपयांच्या बाटलीपेक्षा दहा- 15 रुपयांचा रसाचा पेला केव्हाही बरा’, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
     गत काही दिवसापासून तापमानाचा पारा ३२ ते ३५ अंशांच्या पुढे जाऊ लागला आहे. त्यामुळे रसवंती चालकांच्या व्यवसायाला मोठी ‘बहार’ आली आहे. येत्या काळात उन्हाची तीव्रता अधिक वाढणार असल्याने रसवंती गृहांवर गर्दीचा ओघ आणखी वाढणार आहे.

​’शुद्ध रसा’कडे कल
“सध्या भेसळयुक्त शीतपेयांचे पेव फुटले असताना, फलटणचा गोड ऊस आणि डोळ्यादेखत चरख्यातून निघणारा ताजा रस यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. प्रवासात उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी लोक आवर्जून थांबून रसाचा आस्वाद घेत आहेत.”
— सुरेश रोमन मुक्ताई रसवंती गृह फलटण
​

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!