फलटण (आपलं फलटण) : जावली (ता. फलटण) येथील जि. प. शाळेतील विद्यार्थिनी अदिती बजरंग पवार हिने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर नवोदय प्रवेश परीक्षेत यश संपादन करत नवोदय विद्यालय, सातारा येथे प्रवेश मिळवला आहे. तिच्या या यशामुळे जावली गावाच्या शैक्षणिक परंपरेत भर पडली आहे.
अदितीला वर्गशिक्षक कल्याण वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले असून, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनवलकर तसेच जगताप सर, गायकवाड सर, ओंबासे सर, येळणे मॅडम व काळे मॅडम या सर्व शिक्षकांनी तिच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील अदितीने कठोर परिश्रम आणि अभ्यासातील सातत्य याच्या जोरावर हे यश मिळवले आहे. ती जावली येथील सिद्धनाथ मंदिराचे सालकरी पुजारी बजरंग पवार यांची कन्या आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अदितीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जावली परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार शिक्षक इत्यादी कडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






