फलटण नगरपरिषद : ‘स्थायी’सह सर्व विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

। आपलं फलटण । दि. २६ फेब्रुवारी २०२६ ।

नगरपरिषदेच्या स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी आज (गुरुवारी) आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अपक्ष नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीच्या (खासदार गट) बाजूने कौल दिल्याने, सर्व समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. या राजकीय घडामोडींमुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘खासदार गटा’ने नगरपालिकेवर आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. ही सभा पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी निखील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या निवडींमध्ये अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधण्यात आला आहे. नगरपरिषदेचा गाडा हाकणाऱ्या महत्त्वाच्या सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी ज्येष्ठ नगरसेवक सोमाशेठ जाधव यांची निवड करण्यात आली आहे. उपनगराध्यक्षा प्रियदर्शिनी भोसले या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून कार्य पाहतील. तसेच स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी सचिन अहिवळे, पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी राहुल निंबाळकर, तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी संदिप चोरमले यांची वर्णी लागली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मोहिनी हेंद्रे आणि उपसभापतीपदी कांचन व्हटकर यांची निवड झाली असून, मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समितीच्या जबाबदारी सुपर्णा अहिवळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

नगरपालिकेची सर्वाधिकार संपन्न मानली जाणारी ‘स्थायी समिती’ देखील आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, तर सर्व नवनिर्वाचित सभापती हे सदस्य म्हणून कामकाज पाहतील. याव्यतिरिक्त सभागृहातून भाजपचे गटनेते रोहित नागटिळे, नगरसेवक अशोकराव जाधव आणि राजे गटाचे गटनेते पांडुरंग गुंजवटे (आबा) यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

आजच्या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे सभागृहात पाहायला मिळालेले राजकीय सौहार्द. सभेच्या सुरुवातीला विरोधी राजे गटाचे गटनेते पांडुरंग गुंजवटे शेवटच्या बाकावर बसले होते. मात्र, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आबांच्या ज्येष्ठत्वाचा आदर राखत त्यांना सन्मानपूर्वक पहिल्या रांगेत येऊन बसण्याची विनंती केली. नगराध्यक्षांच्या या आग्रहाचा स्वीकार करत गुंजवटे पहिल्या रांगेत विराजमान झाले. सत्ताधारी आणि विरोधकांमधील या सामंजस्यामुळे राजकीय कटुता बाजूला सारून शहराच्या विकासासाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची चर्चा फलटणकरांमध्ये रंगली आहे.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!