जोशी हॉस्पिटलच्या ‘आपली फलटण मॅरेथॉन’ची दशकपूर्ती; आरोग्य-आनंदाचा जागर७५० हून अधिक गुडघा प्रत्यारोपित रुग्णांची अनोखी ३ कि.मी. वॉकथॉन; २५ ऑक्टोबरला आरोग्य चळवळीचा महामेळावा

फलटण आपलं फलटण प्रतिनिधी : धकाधकीची जीवनशैली, वाढता ताण आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असताना, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ हा संदेश समाजाच्या मनामनात पोहोचविण्यासाठी ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’ सज्ज झाली आहे. यंदा मॅरेथॉनचे दशकपूर्ती वर्ष असून, रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ५.३० वाजता सजाई गार्डन, फलटण येथे या आरोग्य चळवळीचा शुभारंभ होणार आहे.
‘Run for Health & Happiness’ ही यंदाची संकल्पना असून, तरुणाईसोबतच बालक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम, निरोगी जीवनशैली आणि आनंदी जगण्याचा संदेश देण्यात येणार आहे. जागतिक अस्थिरोग दिनाच्या निमित्ताने अवयवदानाचा सामाजिक संदेशही मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
७५० गुडघा प्रत्यारोपित रुग्णांची अनोखी वॉकथॉन
मॅरेथॉनचे विशेष आकर्षण ठरणार आहे ते रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुडघा प्रत्यारोपण झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांची ३ कि.मी. वॉकथॉन. गुडघा प्रत्यारोपणानंतरही आत्मविश्वासाने चालता येते आणि सक्रिय जीवन जगता येते, हा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून समाजाला मिळणार आहे. अशा प्रकारची वॉकथॉन देशात प्रथमच होत असल्याचा आयोजकांचा दावा आहे.
वयोगटानुसार शर्यती
मॅरेथॉनमध्ये २१ कि.मी., १० कि.मी. आणि ५ कि.मी. अंतरांच्या शर्यती होणार आहेत. १८ ते ३०, ३१ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५६ ते ६४ या चार वयोगटांत पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा राहणार आहेत. याशिवाय १२ वर्षांवरील सहभागींसाठी ३ कि.मी. फन रन, तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मोफत ३ कि.मी. वॉकथॉन आयोजित करण्यात आली आहे.
चारही मुख्य वयोगटांमध्ये पुरुष व महिला गटातील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी १० हजार, द्वितीय ७ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, अशी एकूण ६० पारितोषिके देण्यात येणार आहेत.
निसर्गरम्य मार्ग अन् आरोग्यदायी अनुभव
सहभागी धावपटूंना टी-शर्ट, टाइम चिपसह बिब, कॅप, एनर्जी बार आणि सरप्राईज गिफ्ट असलेले मॅरेथॉन किट देण्यात येणार आहे. ऊसशेती आणि द्राक्षबागांच्या परिसरातून जाणारा निसर्गरम्य मार्ग ही मॅरेथॉनची आणखी एक खासियत ठरणार आहे. मार्गावर पाण्याची व्यवस्था, रनपूर्व झुंबा वॉर्मअप आणि रननंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नोंदणी १४ सप्टेंबरपासून
२१, १० आणि ५ कि.मी. शर्यतीसाठी पुरुषांसाठी ७५० रुपये अधिक कर, महिलांसाठी ५०० रुपये अधिक कर, तर ३ कि.मी. फन रनसाठी ३०० रुपये शुल्क आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकथॉन पूर्णपणे मोफत आहे.
मॅरेथॉनची ऑनलाइन नोंदणी सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरू होणार असून, दि. ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
आरोग्य, आनंद आणि सामाजिक बांधिलकीचा संगम असलेल्या या मॅरेथॉनमध्ये फलटणकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन व्यायामाची आणि निरोगी जीवनशैलीची चळवळ घराघरात पोहोचवावी, असे आवाहन डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी, डॉ. प्राची प्रसाद जोशी व जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!