गावोगावी भगवा फडकवण्याचा निर्धार : फलटण-कोरेगावमध्ये शिवसेनेच्या १०० नव्या शाखा उभारणार; संजीवराजे ना. निंबाळकर यांचा निर्धार

फलटण (आपलं फलटण ) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) संघटनात्मक बळकटीसाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. मतदारसंघातील प्रत्येक वाडी-वस्ती आणि गावागावात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी येत्या काळात तब्बल १०० नवीन शाखा स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

संजीवराजे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, संतोष आबा वेताळ, पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते उपस्थित होते.
मतदार याद्यांच्या अद्ययावत प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे संजीवराजे यांनी स्पष्ट केले. फलटण-कोरेगाव मतदारसंघासाठी विराज खराडे यांची ‘बीएलए-१’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना ‘बीएलए-२’ नियुक्त करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. पात्र मतदारांची नावे यादीत कायम राहावीत आणि अपात्र नावे वगळली जावीत, हेच पक्षाचे मुख्य धोरण असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
संघटन विस्तारासाठी ११ मे ते १७ मे या कालावधीत फलटण तालुक्यात १०० शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या शाखांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्ते तत्पर राहतील. विशेषतः तरुणांना राजकारण आणि समाजकारणात सक्रिय सहभागाची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या शाखा प्रभावी माध्यम ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी चंद्रहार पाटील यांनीही माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाची मोठी ताकद आहे ही ताकद अधिक वाढवण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. सातारा जिल्ह्यात पक्षाचे पाच-सहा आमदार माढ्यासह दोन खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचं आहे. संजीव राजे यांच्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळाले आहे राज्यात सर्वाधिक बी एल ए 2 नियुक्तीचे काम माढा मतदारसंघात प्रभावीपणे झाले आहे. या माध्यमातून मतदार यादीत पात्र मतदार कायम ठेवणे व अपात्र मतदार, दुबार मतदार, चुकीचे मतदार राहणार नाहीत यासाठी पक्षाचे प्रतिनिधी प्राधान्याने सतर्क राहून काम करतील
दरम्यान पत्रकार परिषदेपूर्वी कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात पार पडलेल्या मेळाव्याला फलटण तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Spread the love
  • Related Posts

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    फलटण (आपलं फलटण )‘फलटण एज्युकेशन सोसायटी’ संचलित स्वायत्त आणि ‘NAAC A’ दर्जा तसेच ‘NBA’ मान्यता प्राप्त ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण’च्या वतीने ३ जून रोजी भव्य ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!