फलटण (प्रतिनिधी) : रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने बुद्ध जयंती, बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कष्टकरी कामगारांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी कामगारांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या सन्मानाची गरज व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. इम्रान सिकंदर सय्यद, श्री. अतुल शाह, खजिनदार श्री. कैफ शेख, सचिव श्री. मारुती टकले, संचालिका तथा माजी प्राचार्य श्रीमती शाहीन शेख, सौ. रझिया शेख, सौ. माया बनसोडे, उपशिक्षक सौ. सीमा हिंदुराव मुळीक, सौ. सविता शिंदे, सौ. अनिसा सय्यद, सौ. प्रीती शाह, सौ. हिना सय्यद, कु. सना शेख यांच्यासह डिजिटल मीडिया संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक-संचालिका व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.






