फटाके-डीजेला नकार, समाजकार्यास होकार! पिंप्रदचा आदर्श; उत्सव समितीच्या गौरवाची तयारी

फलटण( आपलं फलटण)
पिंप्रद (ता. फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा डीजे व फटाकेमुक्त साजरी करून एक वेगळाच सामाजिक संदेश देण्यात आला. अनावश्यक खर्चाला फाटा देत त्या निधीतून गरजू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या अभिनव संकल्पनेमुळे या गावाने समाजासमोर आदर्श निर्माण केला असून, बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कार्याचा लवकरच गौरव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंप्रद येथील सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार डॉ. जाधव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जेष्ठ पत्रकार अजय माळवे, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, योगेश धेंडे, शाळा समिती अध्यक्ष जनार्दन भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. जाधव यांनी, “डीजे व फटाकेमुक्त जयंतीमुळे समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार होत असून, वाचवलेला निधी समाजोपयोगी कार्यासाठी वापरणे ही खऱ्या अर्थाने जयंतीची सार्थकता आहे,” असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकात मार्गदर्शक सचिन मोरे यांनी समिती गेल्या चार वर्षांपासून सातत्याने समाजाभिमुख उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. जयंती उत्सव केवळ एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर विविध सामाजिक उपक्रम व विद्यार्थी शिबिरे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शरद मोरे यांनी आभार मानले. यावेळी विक्रांत मोरे, विकास मोरे, बापूराव मोरे, संतोष मोहिते, अमर मोरे, राहुल मोरे, विजय बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, यामुळे उपक्रमाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!