जिद्द, चिकाटी अन् तीन वर्षांच्या अथक अभ्यासाचे फळ; रोहित कदम यांची महसूल सहाय्यकपदी निवड!MPSC  परीक्षेत उज्ज्वल यश; आई-वडिलांच्या संस्कारांना यशाची सलामी

आपलं फलटण प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सन २०२५ च्या गट-क परीक्षेत रोहित नारायण कदम यांनी उज्ज्वल यश संपादन केले असून, त्यांची महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे कदम कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रोहित कदम यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिवाजी हायस्कूल, वडूज येथे झाले. त्यानंतर त्यांनी अकरावी व बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण मालोजीराजे शेती महाविद्यालय, फलटण येथे पूर्ण केले. पुढे राजश्री छत्रपती शाहू महाराज अॅग्रीकल्चर कॉलेज, कोल्हापूर येथून कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फलटण येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीस सुरुवात केली.

गेल्या तीन वर्षांपासून रोहित कदम यांनी अत्यंत जिद्दीने, सातत्याने आणि चिकाटीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. अनेकदा येणाऱ्या अडचणींवर मात करत त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाने त्यांच्या मेहनतीला आणि स्वप्नांना मूर्त स्वरूप मिळाले.
रोहित यांच्या यशामध्ये त्यांच्या आई वर्षा कदम यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी नमूद केले. अभ्यासाच्या काळात सातत्याने दिलेले प्रोत्साहन, मानसिक आधार आणि कुटुंबाची साथ यामुळे रोहित यांना ध्येय गाठण्यासाठी बळ मिळाले.

शासकीय सेवेत प्रवेश मिळाल्यानंतर प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलतेने नागरिकांची सेवा करण्याचा आदर्श ठेवावा, अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांसाठी रोहित कदम यांचे यश प्रेरणादायी ठरले आहे.

रोहित कदम यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, जिल्हा शाखा साताराचे अध्यक्ष श्री. पी. बी. नाळे, सचिव श्री. एन. एफ. शेख, मानद अध्यक्ष श्री. सी. एम. शिंदे यांच्यासह आर. एम. फडतरे, एच. आर. फडतरे, जी. बी. खोमणे, व्ही. बी. खोमणे, संदीप गावडे, दादासो गावडे, एम. आर. महामुनी, बबन पानसरे, आर. पी. ननावरे, राम सावंत, आर. आर. भोसले, योगेश शेळके आदींनी अभिनंदन केले.
तसेच अमोल धुमाळ यांनीही रोहित कदम यांचे अभिनंदन करून पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
‘आपलं फलटण’चे संपादक पोपट मिंड यांच्यासह सीएम ग्रुप मित्र परिवाराने रोहित कदम यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!