काळज येथे कृषीदूतांकडून डिजिटल शेती ॲप्सचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

आपलं फलटण, प्रतिनिधी :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत काळज येथे शेतकऱ्यांसाठी व्यावहारिक शेतीविषयक मोबाईल ॲप्लिकेशन्सचे प्रात्यक्षिक आयोजित करून मार्गदर्शन केले.
यावेळी कृषीदूत अभिजीत पिसाळ, रोहन माळी, यश पाटील, राहुल पावरा, सूरज शिंदे, अभिषेक राक्षे व साहिल शिंदे यांनी शेतकऱ्यांना ई-नाम (E-NAM), क्रॉप बी (Crop Bee), अ‍ॅग्री मार्केट (Agri Market), ई-क्रॉप (E-Crop) आणि किसान सुविधा (Kisan Suvidha) या शेतीपूरक मोबाईल ॲप्सची सविस्तर माहिती दिली. तसेच या ॲप्सच्या माध्यमातून बाजारभाव, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि कृषीविषयक अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असल्याचे सांगितले.
डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतीचे नियोजन, उत्पादन खर्चाचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील संधींचा लाभ कसा घेता येतो, याबाबत कृषीदूतांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. या उपक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा. नितिषा पंडित तसेच प्रा. जी. बी. अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
डिजिटल युगात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास शेती अधिक सक्षम, नियोजनबद्ध आणि फायदेशीर होऊ शकते, असा संदेश या उपक्रमातून शेतकऱ्यांना देण्यात आला.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!