फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) कृषी महाविद्यालयाचा ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक जोड प्रकल्प 2026 2027 अंतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी जे ए मिल्क प्रॉडक्ट येथे अभ्यास दौरा आयोजित केला होता या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना दूध संकलन प्रक्रिया पॅकेजिंग तसेच पनीर निर्मितीची संपूर्ण माहिती देण्यात आली
उद्योगातील तज्ञांनी दुधाची गुणवत्ता तपासणी स्वच्छता व्यवस्थापन आणि आधुनिक मशीनरीचे महत्त्व विद्यार्थींनींना समजावून सांगितले पनीर तयार करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया पाहताना विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यु .डी चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डी निंबाळकर कार्यक्रम अधिकारी प्रा एस एम साळुंखे कार्यक्रम समन्वयक नीलिमा ढालपे व प्रा . नितीशा पंडित व प्रा जी बी अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या तेजश्री जाधव, वैष्णवी वाघमारे, वैभवी ननावरे, अस्मिता काटकर ,सिद्धी धुमाळ , सुवर्णा धिंदाळे व कावेरी पळसकर यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.







