फलटण ( आपलं फलटण ): तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तब्बल १०२ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाची सोडत अखेर जाहीर झाली आहे. सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने हा अंतिम कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.८ जून ते ११ जून २०२६ या कालावधीत विशेष ग्रामसभांचे आयोजन करून थेट जनतेसमोर ही सोडत काढली जाणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष याकडे लागले आहे.
दोन सत्रांत होणार सोडत; प्रशासनाची जय्यत तयारी
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र विशेष ग्रामसभा बोलवण्यात येणार आहे. या ग्रामसभांचे नियोजन दोन सत्रांमध्ये करण्यात आले आहे:
सकाळ सत्र सकाळी ११:०० वा.
दुपार सत्र दुपारी ०३:०० वा.
निश्चित केलेल्या तारखेला आणि वेळेतच संबंधित ग्रामपंचायतींमध्ये अधिकृत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत जाहीर केली जाईल.
दिवसनिहाय व सत्रनिहाय ग्रामपंचायत आरक्षण सोडत
दिनांक: ८ जून: २० ग्रामपंचायती
सकाळ सत्र वडजल, ढवळेवाडी (आसु),माझेरी,पिराचीवाडी, नाईकबॉंबवाडी,वड़गांव, माळेवाडी, दालबडी,सोनवडी खुर्द,रावडी खुर्द.
दुपार सत्र फडतरवाडी, शेरेशिंदेवाडी,टाकळवाडे, शेरेचीवाडी (ढवळ), निंभळक, बिबी,शिंदेमाळ,मिरेवाडी (दालबडी),सोनवडी बु., रावडी बु.
९ जून :२८ ग्रामपंचायती
सकाळ सत्र ढवळेवाडी (निं), आसू, धुळदेव,मिरगाव,मिरढे, कापशी, आरडगांव,तावडी, ठाकुरकी, मुरुम,गोळेवाडी, शिंदेनगर,तिरकवाडी, खराडेवाडी.
दुपार सत्र निंभोरे,गुणवरे, अलगुडेवाडी, खडकी, जावली, आळजापूर,विठ्ठलवाडी,जोर (कुरवली खुर्द),फरांदवाडी, खामगांव,गोळेगाव, हणमंतवाडी, सासकल, डोंबाळवाडी.
दिनांक: १० जून २८ ग्रामपंचायती
सकाळ सत्र :खुंटे,साठे, सांगवी, मलवडी,आंदरुड,घाडगेवाडी, कोरेगांव. धुमाळवाडी, झिरपवाडी, होळ, उळूंब, वाघोशी,भाडली बु., तडवळे.
दुपार सत्र: शिंदेवाडी,सरडे, सोनगाव, नांदल,कुरवली बु., हिंगणगाव,तांबवे, बोडकेवाडी, जाधववाडी (फ),काळज, जोर (वाखरी), कोन्हाळे,भाडखुर्द, टाकोबाईचीवाडी.
दिनांक: ११ जून २६ ग्रामपंचायती
सकाळ सत्र :सस्तेवाडी, गोखळी, _खटकेवस्ती, कांबळेश्वर, राजाळे, वाखरी, ढवळ, राजुरी, मुंजवडी,शेरेचीवाडी (हिं), सासवड, तरडगांव.
दुपार सत्र : विंचूर्णी,निरगुडी, कोळकी,साखरवाडी,जिंती. जाधववाडी (आसू), ः पवारवाडी, काशिदवाडी, भिलकटपरहर खुर्द, चांभारवाडी, मुळीकवाडी, घाडगेमळा.
गावकीच्या राजकारणाला उधाण; इच्छुकांची धाकधूक वाढली
या आरक्षण सोडतीमुळे कोणत्या प्रभागात (वार्डात) महिला, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), किंवा इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी जागा राखीव होणार, यावर अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सध्या आरक्षणाच्या गणितांची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रशासनाने संबंधित गावातील नागरिकांना आणि निवडणुकीत रस असणाऱ्या सर्व इच्छुकांना आपापल्या गावच्या निश्चित वेळेनुसार विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत
फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…







