फलटण-कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; उदय सामंत यांच्या उपस्थितीत विजयी सदस्यांचा भव्य सत्कार

फलटण (आपलं फलटण) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संघटनात्मक बांधणीला वेग देण्यात आला असून, पदाधिकारी निवड आढावा बैठक तसेच BLA-2 नोंदणी अभियानाचा आढावा मेळावा बुधवारी (दि. २७ मे) सकाळी १० वाजता कोळकी, ता. फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात फलटण नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या मान्यवर सदस्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असून, मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
बैठकीत पदाधिकारी निवड आढावा, संघटनात्मक मजबुतीकरण, BLA-2 नोंदणी अभियानाची सद्यस्थिती तसेच आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती ठरविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
शिवसेना, २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित या मेळाव्याला सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Spread the love
  • Related Posts

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश
    error: Content is protected !!