फलटण (आपलं फलटण)आगामी २८ मे रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण शांततापूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्यात सोमवारी शांतता समितीची संयुक्त बैठक पार पडली. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव तसेच पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.
बैठकीस शांतता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, मोहल्ला कमिटी सदस्य, पत्रकार, गोरक्षक तसेच कत्तलखाना चालक उपस्थित होते. यावेळी बकरी ईद निमित्त नगरपालिकेकडून तात्पुरता परवाना घेऊनच कत्तलखाने सुरू ठेवावेत, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच गाय, वासरू किंवा खोंड यांची कत्तल कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे प्रकार आढळल्यास शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार संबंधित व्यक्ती अथवा टोळीवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला. तसेच संबंधितांना बीएनएसएस कलम १६८ अन्वये नोटिसाही बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी फलटणची शांतताप्रिय आणि सर्वधर्म समभाव जपणारी ओळख कायम राखण्याचे आवाहन केले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच धार्मिक विधी पार पाडावेत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
बैठकीचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी केले.
आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको
फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…






