इंग्रजी बहिःस्थ परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा डंका; कृपा रणवरे राज्यात तृतीय

फलटण( आपलं फलटण )भारती विद्यापीठांतर्गत ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी–एन्ट्रन्स) परीक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला. इयत्ता सातवीतील कु. कृपा प्रशांत रणवरे हिने १०० पैकी तब्बल ९६ गुण मिळवत राज्यात तृतीय क्रमांक पटकावून विद्यालयाचा मान उंचावला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिला रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी–एन्ट्रन्स/इंग्रजी–प्रायमरी) परीक्षेत मुधोजी हायस्कूलने सलग चौथ्या वर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत राज्यपातळीवर आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे. कु. कृपा रणवरेच्या रूपाने विद्यालयाने पुन्हा एकदा राज्यात ठसा उमटवला असून इतर अनेक विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश संपादन करत प्रशालेचा नावलौकिक वाढवला आहे.
इयत्ता सहावी इंग्रजी प्रायमरी परीक्षेसाठी एकूण ९१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३७ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले, तर १२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. तसेच इयत्ता सातवी इंग्रजी एन्ट्रन्स परीक्षेसाठी ११७ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये ६० विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवत उत्कृष्ट कामगिरी बजावली, तर २२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली.
या उल्लेखनीय यशामागे विद्यालयातील इंग्रजी बाह्य परीक्षा विभाग प्रमुख श्री. अमोल सपाटे, इंग्रजी विभाग प्रमुख सौ. सोहनी सस्ते, तसेच विषय शिक्षक श्री. सचिन धुमाळ, कु. संगीता कदम, सौ. मुक्ता शिंदे, कु. सुषमा घोरपडे व सौ. विभा गुजर यांचे मार्गदर्शन लाभले.
कु. कृपा रणवरेच्या यशाबद्दल तिचे व मार्गदर्शक शिक्षकांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार मा. दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री. दिलीप राजगुडा, सहाय्यक तपासणी अधिकारी श्री. सुधीर अहिवळे, प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे, उपप्राचार्य श्री. ए. वाय. ननवरे, ज्युनियर कॉलेज उपप्राचार्य श्री. सोमनाथ माने, पर्यवेक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी अभिनंदन केले.
मुधोजी हायस्कूलच्या या दैदिप्यमान यशामुळे फलटणच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक अधिकच उंचावल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत

Spread the love
  • Related Posts

    माळेगाव कारखान्याचा पहिला ऊस हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देणार,फलटण तालुक्यातील गेटकेन ऊस उत्पादकांनाही चांगला दर; पहिल्या दिवसापासून ऊसतोडीचे नियोजन

    आपलं फलटण (समाधान कळसकर) : फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांप्रमाणेच ऊसदर देण्यात येईल. तसेच आगामी गळीत हंगामातील ऊसाचा पहिला हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न…

    Spread the love

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?” डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात; लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    फलटण: (पोपट मिंड) फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येने केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नसून, आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलता, तक्रारींचे गांभीर्य आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    माळेगाव कारखान्याचा पहिला ऊस हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देणार,फलटण तालुक्यातील गेटकेन ऊस उत्पादकांनाही चांगला दर; पहिल्या दिवसापासून ऊसतोडीचे नियोजन

    माळेगाव कारखान्याचा पहिला ऊस हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देणार,फलटण तालुक्यातील गेटकेन ऊस उत्पादकांनाही चांगला दर; पहिल्या दिवसापासून ऊसतोडीचे नियोजन

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?” डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात; लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?”                                 डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात;       लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात
    error: Content is protected !!