मायणी (आपलं फलटण प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी. (H.S.C.) बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत मायणी येथील ‘भारतमाता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज’ने आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून विद्यालयाचा एकूण निकाल ८९.१०% लागला आहे.
विद्यालयाच्या तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. असून, विशेषतः विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी निकालाची टक्केवारी उंचावली आहे.
शाखानिहाय निकाल
कला शाखा: ८०.% वाणिज्य शाखा: ९०.४७% विज्ञान शाखा: ९६.६१%
शाखा निहाय प्रथम तीन गुणवंत विद्यार्थी
विज्ञान शाखेतून कु. बागल प्रेरणा गणेश ( ८७.%). कु. काटकर गायत्री जिजाप्पा (८३.) कु. गायकवाड श्रद्धा मंगेश (७३.१७%) वाणिज्य शाखा कु. माने ज्ञानेश्वरी काशिनाथ( ८४.६७%) कु. जाधव सायली महेश (८४.१७%) कु. माने अनामिका यतिन (८३.८३%).कला शाखेतून कु. निकम हर्षदा बापूराव (८१.६७%) कु. गुरव पल्लवी चंद्रशेखर (७८.५०%) कु. निकम साक्षी संपत (७५.१७%)
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन सुरेंद्रदादा गुदगे, संचालिका जयश्री गुदगे, संचालक एन व्ही कुबेर, अरविंद पुस्तके, डी आर पिटके, विक्रम देशमुख,प्राचार्य शशिकांत खैरमोडे, माजी उपप्राचार्य एस. आर. काळे, उपप्राचार्य सी. एस. सजगणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
दरम्यान इयत्ता ११ वी १२ वीच्या कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांसाठी ‘ऑनलाईन प्रवेश’ प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






