दुःखद अपघात : पती-पत्नीचा जागीच मृत्यू राजुरी गावावर शोककळा

फलटण (आपलं फलटण )आळंदी–पंढरपूर पालखी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात राजुरी चौफुला (तालुका फलटण )येथील गजानन रामचंद्र जाधव व त्यांच्या पत्नी सिंधुताई गजानन जाधव यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जाधव दांम्पत्य हे पिंप्रद (ता. फलटण) येथे लग्नकार्यासाठी मोटारसायकलवरून जात होते. फलटणच्या दिशेने प्रवास करत असताना उलट्या दिशेने भरधाव आलेल्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले.अपघातानंतर दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, फलटण येथे हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच बरड दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी अमोल चांगण घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला.या अपघातामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करत संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, याच मार्गावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकी स्वराने ट्र ट्रकला धडक दिल्याने विडणी येथील एकाचा अपघातात मृत्यू झाला होता. सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे पंढरपूर–फलटण मार्ग अपघातप्रवण क्षेत्र बनत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून होत आहे.मृत जाधव दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे. राजुरी चौफुला येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अपघातात दांपत्य मृत्यू पावल्याने राजुरी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत

Spread the love
  • Related Posts

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?” डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात; लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    फलटण: (पोपट मिंड) फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येने केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नसून, आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलता, तक्रारींचे गांभीर्य आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर…

    Spread the love

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?” डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात; लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?”                                 डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात;       लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!
    error: Content is protected !!