फलटणमध्ये प्रभाग रचनांवर 97 हरकती सोमवारी होणाऱ्या सुनावणी कडे लक्ष

फलटण (आपलं फलटण) फलटण तालुक्यातील मुदत संपलेल्या  ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून प्रभाग रचनांवर ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवण्यात आल्या आहेत .नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनावर हरकती नोंदवण्यासाठी 7 ते 13 एप्रिल हा कालावधी देण्यात आला होता या कालावधीत तालुक्यातील 29 गावातून 97 हरकती दाखल झाल्या असून या हरकतीवर काय निर्णय होतो याकडे हरकती घेणाऱ्या ग्रामस्थांच्या नजरा लागलेल्या आहेत
राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून फलटण तालुका ओळखला जातो. दोन निंबाळकरांच्या मध्ये तालुक्यातील बहुतेक सर्व निवडणुका चुरशीच्या होताना दिसून येत आहेत. आगामी ग्रामपंचायत निवडणुका देखील तितक्याच संघर्षमय वातावरणात अटीतटीच्या होणार असे गावोगावी  चित्र दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत पक्षीय बलाबल सम समान राहिले होते. जिल्हा परिषदेमध्ये राजे गटाने आघाडी घेतली होती. यानंतर तालुक्यात गावागावात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी प्रभाग रचना हा मुद्दा अधिकच महत्त्वाचा ठरला आहे. अनेक ठिकाणी प्रभागांचे विभाजन, लोकसंख्या संतुलन आदि मुद्द्यावरून ग्रामस्थांनी हरकती नोंदवल्या आहेत
  तालुक्यात सर्वात जास्त हरकती कापडगाव 22, पिंपळवाडी, भाडळी खुर्द, रावडी खुर्द या गावांमध्ये प्रत्येकी सात, ढवळेवाडी (निं.),शिंदेवाडी, तिरकवाडी येथे प्रत्येकी सहा, सस्तेवाडीत 5, निंभोरे व ढवळ गावात प्रत्येकी चार, फरांदवाडी 3,धुळदेव व अलगुडेवाडी प्रत्येकी दोन, ठाकूरकी, झिरपवाडी, कोळकी, मलवडी ,नांदल, तांबवे, शेरेचीवाडी (ढ.),कोरेगाव, आंदरुड, जावली, कुरवली बुद्रुक, हनुमंतवाडी, कोऱ्हाळे, सोनगाव, धुमाळवाडी, निरगुडी या गावातून प्रत्येकी एक, हरकत नोंदवली असून तालुक्यातून 97 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.
या सर्व हरकतीवर आज सोमवार दिनांक 20 रोजी प्रांताधिकारी यांच्याकडे सुनावणी होणार असून सुनावणीनंतरचा अहवाल जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येणार आहे जिल्हाधिकाऱ्याकडून 28 एप्रिल ला अंतिम यादी आयोगाकडे पाठवण्यात येणार असून चार मेला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. फलटण तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते इच्छुक उमेदवार यांचे या बाबीकडे बारकाईने लक्ष असून गाव पातळीवरील सत्ता समीकरणावर या निर्णयाचा परिणाम होणार असल्याने गावोगावी राजकीय हालचाली गतिमान दिसत आहेत

Spread the love
  • Related Posts

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

     आपलं फलटण प्रतिनिधी “स्थानिक विरोधकांच्या सांगण्यावरून श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा षडयंत्राला बळी पडू नये. सभासदांच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासाच्या जोरावर श्रीराम सहकारी साखर…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!