जि.प.शाळाच ग्रामीण शिक्षणाचा मानबिंदू :शिवांजली भोसले माझेरी जि.प. शाळेचा ‘उडान कलाविष्कार 2026’ ठरला गुणवत्तेचा जल्लोष

फलटण (आपलं फलटण) “इंग्रजी माध्यमातून शिकल्यावरच मुलांचे भविष्य उज्वल घडते, हा पालकांचा समज माझेरी (तालुका फलटण) जि.प.शाळेने आपल्या विद्यार्थ्यांच्या चौफेर गुणवत्तेच्या जोरावर दूर केला आहे. ‘माझी शाळा जिल्ह्यात सर्वोत्तम आहे’ असे अभिमानाने म्हणावे लागेल,” असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले यांनी केले. त्या माझेरी (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेत आयोजित स्नेहसंमेलन व ‘उडान कलाविष्कार 2026’ कार्यक्रमात बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या स्पर्धेच्या युगात झेप घेतलेल्या या शाळेने गुणवत्तेच्या बळावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार घडविण्याचे कार्य येथे प्रभावीपणे होत आहे. शाळेला आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सभापती म्हणून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमात बालकलाकारांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मनं जिंकली. लोकनृत्य, लोककला, लावणी, रॅप, झुंबा तसेच हिंदी-मराठी चित्रपटांतील गाजलेल्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणामुळे सभागृहात अक्षरशः ‘बाल ऑर्केस्ट्रा’चा माहोल निर्माण झाला. टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येक सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली.
या कार्यक्रमास उपसभापती अमोल सस्ते, जि. प. सदस्या ज्योती मोरे, पंचायत समिती सदस्य सचिन अभंग, गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती, केंद्रप्रमुख राजश्री कुंभार, संजय धुमाळ, माजी केंद्रप्रमुख दादासाहेब चोरमले, माजी सरपंच मनिषा दिघे, सिताबाई दिघे, तसेच ग्रामस्थ, मान्यवर आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू दिघे, उपाध्यक्ष उमेश झांजुर्णे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राघू दिघे, तसेच समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘माझेरीयन’ परिवारातील स्पर्धा परीक्षांचे आयडॉल भोलाचंद बरकडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक रवींद्रकुमार लटिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आदर्श शिक्षक गणेश पोमणे, भारती शेळके, संतोष जगताप, सरस्वती भोईटे, प्रिया निंबाळकर, स्वप्ना जाधव आदी शिक्षकवृंदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
पालक, ग्रामस्थ, प्रायोजक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘उडान कलाविष्कार 2026’ हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. माझेरी जि.प. शाळेने आपल्या दर्जेदार उपक्रमांमुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा आदर्श निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!