टेकबिट्स २K२६’मध्ये रंगला तरुणाईचा जल्लोष; ‘डान्स-फॅशन शो’ ने वेधले लक्ष

‘फलटण (आपलं फलटण) फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित ‘टेकबिट्स २K२६’ या भव्य टेक्नो-कल्चरल युथ फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अष्टपैलू कलागुणांची दिमाखदार झलक सादर करत उपस्थितांची मने जिंकली. २० मार्च रोजी पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि २१ मार्च रोजी संपन्न झालेल्या ‘युवा महोत्सवा’ने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
२० मार्च रोजी झालेल्या मुख्य सांस्कृतिक सोहळ्याला महिंद्रा लॉजिस्टिक्स, फलटण येथील मॅनेजर ऑपरेशन्स सतीश कुमार सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांच्या आत्मविश्वासाचे विशेष अभिनंदन केले.
तर, २१ मार्च रोजी झालेल्या महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे येथील प्राचार्य डॉ. एस. बी. ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य भोजराज नाईक निंबाळकर तसेच प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांची उपस्थिती लाभली.
महोत्सवातील ‘फॅशन विथ ॲटिट्युड’ (फॅशन शो) आणि ‘वन क्रू, वन बीट’ (ग्रुप डान्स) या प्रमुख स्पर्धा विशेष आकर्षण ठरल्या. या दोन्ही स्पर्धांतील विजेत्या संघांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय सोलो डान्स, कपल डान्स आणि प्रहसन (स्किट्स) या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर प्रभावी मांडणी करत मनोरंजनासह प्रबोधनही केले.
या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो,” असे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक समन्वयक प्रा. सी. एम. गोरड, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे हा महोत्सव शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला.

Spread the love
  • Related Posts

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    फलटण( आपलं फलटण वृत्तसेवा ) ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक दर, कामगारांना योग्य वेतन, बोनस व अन्य सवलती तसेच तोडणी-वाहतूक ठेकेदारांना वेळेवर मोबदला मिळणे यावरच साखर कारखान्यांचे यश अवलंबून आहे. मात्र साखरेला…

    Spread the love

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत
    error: Content is protected !!