फलटण तालुक्यात गहू काढणीला वेग; मजूर टंचाईमुळे हार्वेस्टिंगला शेतकऱ्यांची पसंती

.फलटण (आपलं फलटण)फलटण तालुक्यात रब्बी हंगामातील गहू काढणीला वेग आला असून शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी हार्वेस्टिंग मशिनकडे वळताना दिसत आहेत. मजूर टंचाई, वाढते मजुरी दर आणि वेळेची मर्यादा या कारणांमुळे दिवसेंदिवस यांत्रिकीकरणाला अधिक पसंती मिळत आहे.
       पूर्वी गहू कापणीसाठी विळ्याने कापणी करून बांधणी, रचणी आणि नंतर मळणी अशी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया केली जात असे. या पारंपरिक पद्धतीत वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होत होते. कुटुंबातील सदस्यांसह मजुरांच्या मदतीने ही कामे केली जात; मात्र सध्या ग्रामीण भागात मजूर उपलब्धतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक मजूर बांधकाम व इतर कामांसाठी शहरांकडे वळल्याने शेतीकामासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे.
यामुळे शेतकरी हार्वेस्टिंग मशिनद्वारे थेट कापणी व मळणी करून घेत आहेत. या मशिनमुळे कमी वेळेत मोठ्या क्षेत्रातील गहू काढणी पूर्ण होते. सध्या गहू मळणीसाठी हार्वेस्टिंगचा दर एकरी साधारण तीन हजार रुपयांपर्यंत घेतला जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. डिझेल दरवाढ, मशिनची देखभाल व वाहतूक खर्च यामुळे दरात वाढ झाल्याचे सांगितले जाते.
       शेतकऱ्यांच्या मते, पारंपरिक पद्धतीने काढणी केल्यास  वाढीव मजुरी जाते वेळही अधिक लागतो त्याउलट हार्वेस्टिंगमुळे काही तासात एका दिवसात तयार माल घरात पोहोचतो. विशेषतः हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता वेळेत काढणी होणे महत्त्वाचे ठरते. अचानक पाऊस आल्यास उभ्या पिकाचे नुकसान होण्याची भीती असते.
तालुक्यात  गव्हाचे पीक चांगल्या अवस्थेत असून उत्पादन समाधानकारक राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि बाजारभावाबाबतची अनिश्चितता यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
एकंदरीत, बदलत्या परिस्थितीत यांत्रिकीकरण हा पर्याय शेतकऱ्यांसाठी गरजेचा बनत असून, गहू काढणी हंगामात हार्वेस्टिंग मशिनचा आवाज शिवारात घुमू लागला आहे.

   काही वर्षांपूर्वी व आजही गहू कापणी हंगामात पंजाब व हरियाणा राज्यातून हार्वेस्टिंग मशीन फलटण तालुक्यात दाखल होत आहेत मात्र अलीकडच्या काळात स्थानिक व्यावसायिक व प्रगत शेतकऱ्यांनी स्वतःची हार्वेस्टिंग मशीन खरेदी करून ती शेतकऱ्यांच्या सेवेत आणली आहेत. त्यामुळे मशीन वेळेत व सुलभ दरात उपलब्ध होत आहेत.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!