फलटण (आपलं फलटण )कोळकी जि.प. गटातील वाड्या-वस्त्यांवर मूलभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी आ. सचिन पाटील यांच्या निधीतून विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सौर दिवे, रस्ते, बंदिस्त गटर योजनांसाठी निधी उपलब्ध झाला आहे.
जयकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आ.सचिन पाटील, माजी खा. रणजितसिंह ना. निंबाळकर व अँड. जिजामाला ना.निंबाळकर यांच्या प्रयत्नातून कोळकी गटातील गावांमध्ये ३५ सौर दिव्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कोळकी, गिरवी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, भाडळी खुर्द व बु., सोनवडी बु., कुरवली, जाधववाडी, झिरपवाडी, ठाकुरकी, तावडी, दालवडी, निरगुडी, मांडवखडक, विचुरणी, सासकल या गावांचा समावेश आहे.
डोंगरी विकास योजनेतून दालवडीस ५ लाख तर भाडळी खुर्द येथे २.५० लाख रुपये बंदिस्त गटर योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. आमदार निधीतून गोळेगाव ठाकुरकी व झिरपवाडी येथे प्रत्येकी १० लाख रस्त्यासाठी तर गिरवी जाधववाडा येथे ७ लाखाचे सभामंडप मंजूर झाले आहे.






