फलटण प्राईडचा सन्मान; सहा पेट्रोल पंपांवर बाजार समितीचा भर. फलटण बाजार समितीची वार्षिक सभा संपन्न

सभेस आ. रामराजे नाईक निंबाळकर. आ.दीपकराव चव्हाण, जि. प. चे मा. अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर, श अनिकेतराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. ज्योती मोरे, सौ. वैशाली कांबळे, पंचायत समिती उपसभापती अमोल सस्ते, कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, फलटण तालुका जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष संजय भगत, हमाल-मापाडी प्रतिनिधी, अडते, व्यापारी प्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. रामराजे म्हणाले, बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या चांगल्या कामकाजामुळेच फलटण बाजार समितीस सलग चौथ्यांदा वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार मिळाला आहे. बाजार समितीने विविध क्षेत्रात केलेले काम आणि संस्थेची सातत्यपूर्ण वाटचाल उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांनी सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. अशा गुणवंतांच्या कार्याची दखल घेऊन बाजार समितीच्या वतीने ‘फलटण प्राईड’ या नावाने त्यांचा गौरव करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. फलटणच्या मातीतील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच बाजार समितीस १२ पेट्रोल पंप मंजूर असले तरी सर्व पेट्रोल पंपांचे व्यवस्थापन, त्याची व्याप्ती आणि समितीचा उपलब्ध स्टाफ विचारात घेता सध्या सहा पेट्रोल पंपांवरच कामकाज केंद्रित ठेवणे योग्य ठरेल. या निर्णयास सभेने मंजुरी दिली आहे.
माजी आमदार दीपकराव चव्हाण म्हणाले, बाजार समितीने शिवभोजन, मालोजी शिदोरी, शासकीय धान्य खरेदी तसेच पेट्रोल पंप यांसारखे विविध उपक्रम राबवून शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे काम केले आहे. बाजार समितीच्या या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, बाजार समितीने उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम राबविले असून संचालक मंडळ आणि स्टाफमध्ये असलेले टीमवर्क संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरत आहे. बाजार समिती सातत्याने प्रगतीपथावर असून संस्थेच्या कामकाजात हीच गतिमानता कायम राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेच्या प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेले दुःखद निधन तसेच फलटण बाजार समितीचे माजी चेअरमन विजयराव बोरावके, पोपटराव काकडे यांच्यासह अहवाल सालात शेतकरी, बाजार घटक, सहकार, पणन, कला, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वीर जवान आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजलीचा ठराव मंजूर करण्यात आला.

सभेत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव शंकरराव सर्जेराव सोनवलकर यांनी अहवाल वाचन करून सन २०२५-२६चा वार्षिक अहवाल, ताळेबंद, उत्पन्न-खर्च पत्रक, सन २०२६-२७चे वार्षिक अंदाजपत्रक तसेच सन २०२४-२५च्या शासकीय वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची माहिती दिली. सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने ऐनवेळी आलेल्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
यावेळी बाजार समितीचे संस्थापक महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर तसेच फलटण तालुक्यात दुसरी हरित क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले आ. रामराजे नाईक निंबाळकर यांचे तैलचित्र बाजार समितीमध्ये लावण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
सभेस कृषि उत्पन्न बाजार समितीचे व्हाइस चेअरमन भगवानराव होळकर, संचालक ज्ञानदेव गावडे, तुळशीराम शिंदे, दीपक गौंड, शंभूराज पाटील, सचिन लोखंडे, संचालिका सौ. सुनीता रणवरे, सौ. जयश्री सस्ते, प्रवीण खताळ, किरण शिंदे, अक्षय गायकवाड, संतोष जगताप, संजय कदम, समर जाधव, निलेश कापसे तसेच ॲडव्हायजरी पॅनल सदस्य मोहनराव निंबाळकर, पोपटराव बुरुंगले, मोहनराव डांगे, अमोल रासकर, रवींद्र कदम, बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव शंकरराव सर्जेराव सोनवलकर व सहकारी सर्व स्टाफ उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन प्रमोद रणवरे यांनी केले, तर बाजार समितीचे संचालक संतोष जगताप यांनी आभार मानले.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!