मोफत औषधोपचारासह आरोग्य शिबिर; रक्षक रयतेचा महिला फाउंडेशनचा आदर्श उपक्रम

मोफत औषधोपचारासह आरोग्य शिबिर; रक्षक रयतेचा महिला फाउंडेशनचा आदर्श उपक्रम
फलटण (आपलं फलटण)
रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन, फलटण यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात केवळ तपासणीच नव्हे तर महागडी औषधेही मोफत देत एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून समाजासमोर आदर्श निर्माण झाला असून अशा उपक्रमांची सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असे मत श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव व माजी नगरसेवक डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी व्यक्त केले.
येथील नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालयात डॉ. बारकीज होमिओपॅथिक, ईश्वरपूर (इस्लामपूर) यांच्या सहकार्याने कॅन्सर वेदनामुक्ती, डोळ्यांचे आजार, जुनाट सर्दी, दमा, खोकला व विविध फंगल इन्फेक्शनवर मोफत तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आध्यात्मिक क्षेत्रातील परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज, डॉ. उत्तमकुमार बारकी, सीए मंजुषा धायगुडे, नगरसेवक पंकज पवार, डॉ. अतुल दोशी, पत्रकार युवराज पवार, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पोतेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. बेडके म्हणाले, अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरांमध्ये केवळ तपासणी केली जाते; मात्र येथे पंधरा दिवसांची मोफत औषधे दिली जात असल्याने हा उपक्रम विशेष ठरतो. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरही उपचार देण्याचा प्रयत्न स्तुत्य असून, अशा शिबिरांचे आयोजन तालुक्यात अधिक प्रमाणात व्हावे यासाठी आपण सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. उत्तमकुमार बारकी यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. गोरगरीब रुग्णांसाठी ते आधारवड ठरत असून सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत, समाजासाठी निःस्वार्थ भावनेतून सुरू असलेले हे काम उल्लेखनीय असल्याचे सांगितले. पुढील सर्व उपक्रमांना आपला आशीर्वाद कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बारकी यांनी होमिओपॅथिक उपचारांचे महत्त्व पटवून देताना, अनेक जटिल आजारांवर हे उपचार प्रभावी ठरत असल्याचा विश्वास व्यक्त केला. नगरसेवक पंकज पवार यांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे स्वागत इम्तियाज तांबोळी यांनी केले, प्रास्ताविक नंदा बोराटे यांनी तर आभार मनीषा घडिया यांनी मानले. या शिबिरात एकूण २३७ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.
या उपक्रमासाठी नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय, डॉ. अतुल दोशी, हॉटेल ब्रह्मा प्युअर व्हेज, फलटण तसेच सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पोतेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Spread the love
  • Related Posts

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    फलटण( आपलं फलटण वृत्तसेवा ) ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक दर, कामगारांना योग्य वेतन, बोनस व अन्य सवलती तसेच तोडणी-वाहतूक ठेकेदारांना वेळेवर मोबदला मिळणे यावरच साखर कारखान्यांचे यश अवलंबून आहे. मात्र साखरेला…

    Spread the love

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत
    error: Content is protected !!