गजानन चौकातील ऐतिहासिक शिरीष वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांचा एल्गार

फलटण (आपलं फलटण) शहरातील गजानन चौक परिसरात गेली अनेक दशके दिमाखात उभे असलेले ५० वर्षांहून अधिक जुने शिरीष वृक्ष वाचविण्यासाठी आता पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. पालखी मार्गावरील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामुळे या ऐतिहासिक वृक्षांच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याने नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या वृक्षांची तोड होण्याची शक्यता व्यक्त होताच शहरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, पक्षी निरीक्षक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या मते, गजानन चौकातील हे शिरीष वृक्ष केवळ झाडे नसून फलटणच्या पर्यावरणीय वारशाचे प्रतीक आहेत.
उन्हाळ्यात हजारो नागरिकांना सावली, थंडावा आणि शुद्ध हवा देणारे हे वृक्ष वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन प्रदूषण नियंत्रणास मदत करणाऱ्या या वृक्षांमुळे परिसरातील पर्यावरणीय संतुलन टिकून राहत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या वृक्षांवर House Crow, Jungle Crow यांची शेकडो घरटी असून Spotted Owlet व Barn Owl यांसारख्या दुर्मिळ पक्ष्यांचेही वास्तव्य आढळून आले आहे. त्यामुळे हे वृक्ष स्थानिक पक्षीजीवनासाठी महत्त्वाचे अधिवास ठरत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले. वृक्षतोड झाल्यास अनेक पक्ष्यांचे निवासस्थान नष्ट होऊन स्थानिक जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
रस्ता रुंदीकरण करताना पर्यावरणपूरक पर्यायांचा विचार करावा, आवश्यक असल्यास आराखड्यात बदल करावा तसेच वृक्षांच्या मुळांना कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी संस्थेने प्रशासनाकडे केली आहे.
“विकास आवश्यक असला तरी तो पर्यावरणाच्या हानीच्या किंमतीवर होऊ नये. अनेक पिढ्यांना सावली आणि स्वच्छ हवा देणाऱ्या या वृक्षांचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भावना संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
दरम्यान, सोशल मीडियावरही “वृक्ष वाचवा – पर्यावरण वाचवा” मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!