सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली; निखिल पिंगळे सातारचे नवे पोलीस अधीक्षक

सातारा (आपलं फलटण) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून, सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे येथील पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे यांची सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार हा बदली आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने या बदल्या करण्यात आल्या असल्याचे शासन आदेशात नमूद आहे.तुषार दोशी यांची सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळची कार्यपद्धती वादग्रस्त ठरली होती. विधानसभेमध्ये त्यांचे जोरदार पडसाद उमटले होते त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आरोप प्रत्यारोप झाले होते त्यांच्या निलंबनाच्या कारवाई वरूनही सत्ताधारी भाजप शिवसेना राष्ट्रवादी मध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. तुषार दोशी यांना रजेवर पाठवण्यात आले होते. ते कोणत्या रजेवर गेलेत त्या रजेवरूनही जिल्ह्यातील दोन मंत्र्यां मध्ये कलगीतुरा रंगला होता. आता सांगली येथे त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.दरम्यान, निखिल पिंगळे हे पुणे शहरातील पोलीस उपआयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना सातारा जिल्ह्याचा कार्यभार देण्यात आला असून, त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला नवे नेतृत्व मिळणार आहे.या बदल्यांमुळे सातारा व सांगली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत काही प्रमाणात फेरबदल होणार असून, नवीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love
  • Related Posts

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?” डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात; लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    फलटण: (पोपट मिंड) फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येने केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नसून, आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलता, तक्रारींचे गांभीर्य आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर…

    Spread the love

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?” डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात; लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?”                                 डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात;       लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!
    error: Content is protected !!