माझेरीत ‘कलाविष्कार २०२६’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

फलटण (आपलं फलटण) जिल्हा परिषद मॉडेल स्कूल माझेरी येथे ‘कलाविष्कार २०२६’ या वार्षिक स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन बुधवार दि. ०८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून विविध कला, नृत्य, नाट्य व सांस्कृतिक सादरीकरणांचा रंगतदार आविष्कार सादर केला जाणार आहे.
या कार्यक्रमास आ. रामराजे ना. निंबाळकर आ.सचिन पाटील, सभापती शिवांजली भोसले, उपसभापती अमोल सस्ते उपस्थित राहणार आहेत.
विशेष उपस्थितीत जि.प.सदस्या ज्योती गौतम मोरे पं.स. सदस्य सचिन अभंग गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोंबले, गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती. विस्तार अधिकारी वर्षा गायकवाड,केंद्रप्रमुख राजश्री संभाजी कुंभार ) सरपंच मनीषा ज्ञानेश्वर दिघे व उपसरपंच पृथ्वीराज दिघे यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू दिघे, उपाध्यक्ष उमेश झांजुर्णे, मुख्याध्यापक रविंद्रकुमार लटिंगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सर्व ग्रा.पं. सदस्य, शिक्षकवृंद माझेरी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे.
या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून गणा पैलवान वेब सिरीज कलाकार टीम उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमास पालक ग्रामस्थांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love
  • Related Posts

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    फलटण( आपलं फलटण वृत्तसेवा ) ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक दर, कामगारांना योग्य वेतन, बोनस व अन्य सवलती तसेच तोडणी-वाहतूक ठेकेदारांना वेळेवर मोबदला मिळणे यावरच साखर कारखान्यांचे यश अवलंबून आहे. मात्र साखरेला…

    Spread the love

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत
    error: Content is protected !!